House_Flats 
अर्थविश्व

कोरोना काळात घर विकत घेण्याची चांगली संधी?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे घरांच्या किंमती आणि व्याज दर कमी झाले आहेत. त्यामुळे घर घेणे किंवा सध्या असलेल्या घरापेक्षा मोठं घर घेण्याचा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो. मात्र, घर विकत घेण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतलेला असावा, कारण कोरोना महामारीमुळे घराच्या किंमती या काही काळासाठी कमीच राहणार आहेत. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की, कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे तुमच्या हातात वाहता पैसा राहणे महत्वाचे आहे. जास्तीचा खर्च करुन तुम्ही अधिकची जबाबदारी शिरावर घेणे योग्य ठरणार नाही.

घर विकत घ्यायचं की भाड्याने राहायचं?

ज्यांची नोकरी आणि वेतन स्थिर आहे आणि जे खूप काळापासून घर घेण्याचा विचार करत आहेत. अशांसाठी ही वेळ सर्वोत्तम आहे. खूप काळापासून घर विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच घर विकत घेऊ पाहणाऱ्यांचा वरचष्मा असणार आहे. बिल्डरच्या नियमांनुसार न चालता तुम्हाला वाटाघाटी करण्याची ताकद मिळणार आहे. तुम्ही ठरवल्यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला घर मिळू शकते.

महात्मा गांधींनी देशाची फाळणी केली का? आक्षेप आणि वास्तव

महामारीमुळे ज्यांना आर्थिक अडचणीतून जावं लागत आहे, तसेच ज्यांच्या नोकरीबाबत निश्चितता नाही, त्यांनी भाड्याच्या घरात राहणेच चांगले राहिल. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही आर्थिक जोखीम न घेता भाड्याच्या घरातच राहणे सोयिस्कर ठरेल. शिवाय भाड्याच्या घरांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. 

विकत किंवा भाड्याने? कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल

नवीन घर घेऊ शकतात अशा लोकांनीही काही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. मोक्याच्या जागी असलेल्या घराच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. शिवाय पुढील एक-दोन वर्ष तरी या किंमती कमीच राहण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादे घर विकत घेतले आणि ते एकाद्याला भाडेतत्वावर दिले तर तुम्हाला नुकसान सहन करावा लागू शकते. कारण घराचे भाडे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे तुम्ही घरासाठी जेवढा ईएमआय भरताय, त्यापेक्षा कमी उत्पन्न तुम्हाला भाड्यातून मिळेल. शिवाय तुम्ही सध्या भाड्याच्या घरातच राहणे फायद्याचे आहे. कारण पुढील काही वर्षे तरी तुम्हाला कमी भाडे द्यावे लागणार आहे किंवा तुमचे भाडे वाढणार नाही.

लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दलच्या माहित नसलेल्या ८ गोष्टी, असा पंतप्रधान...

उदाहरणात, जर तुम्ही 1 करोड रुपयाचे घर घेत आहात आणि त्यासाठी तुम्ही 80 लाखांचे कर्ज घेतले आहे. त्यावरील व्याज दर 20 वर्षांसाठी 7.5 टक्क्यांनी, ईएमआय म्हणून महिन्याला तुम्हाला 65,000 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे तुम्ही भाड्याने याच घरी राहत असाल, तर तुम्हाला खूप कमी भाडे द्यावे लागू शकते. 

अर्थव्यवस्था मंदीच्या अवस्थेत असताना नोकरदार आणि व्यावसायिक अशा दोघांनाही पैशाची कमतरता भासू लागली आहे. भविष्याबाबत अनिश्चितता आहे. अधिकची जबाबदारी घेणे म्हणजे स्वत:ची चिंता वाढवून घेण्यासारखं आहे. कोरोनावर अजूनही उपचार सापडला नसल्याने तुमच्याकडे वाहते पैसे असणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत एखाद्या गोष्टीत पैसे गुंतवणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यता पडताळून पाहा. कोरोना महामारीची फारशी झळ न पोहोचलेल्या आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्यांनी घर घेण्यास काही हरकत नाही, पण इतरांनी परिस्थिती सुधारण्याची वाट पाहणे चांगले ठरेल. 

(edited by- kartik pujari)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

Mumbai News: आझाद मैदानाशेजारील दुकानं बंद होणार, स्टॉलधारकांवर पालिकेचा कारवाईचा बडगा

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT